Home > Political > शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; शिवसैनिकाची केली चौकशी..

शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; शिवसैनिकाची केली चौकशी..

शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; शिवसैनिकाची केली चौकशी..
X

राज्यात मागील 21 दिवसात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काल कल्याण पूर्व मतदार संघाचा दौरा केला. यावेळी कल्याण पूर्वे मधील मध्यवर्ती शाखेत प्रवेश करण्यात शिंदे यांना शिवसेनेच्या महिला संघटक अशा रसाळ यांनी विरोध केल्याची पोस्ट समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी अशा रसाळ यांना व इतर शिवसेना कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बोलून त्यांची चौकशी केली. या चौकशी नंतर त्यांनी या प्रकारची कोणतीही घटना कालच्या दौऱ्यात घडलेली नसून ही पोस्ट राजकीय वाद वाढवण्यासाठी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने करण्यात आल्याचीच तक्रार आशा रसाळ यांनी पोलिसात दिली. दरम्यान या प्रकरणी बोलताना पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी खासदार शिंदे यांच्या दौऱ्यात संपूर्ण पोलीस दल तैनात होते. अशी कोणती घटना घडलेली नसून ही वादग्रस्त पोस्ट समाज माध्यमावर व्हायरल करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या व्यक्तीचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सचिन गुंजाळ, डीसीपी, कल्याण

Updated : 8 July 2022 7:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top