Home > Political > आता पंकजा मुंडे यांचं काय?

आता पंकजा मुंडे यांचं काय?

आता पंकजा मुंडे यांचं काय?
X

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण भावांमधील वाद राज्याला नवीन नाही. 2019 च्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली होती. हे सगळं सुरू असताना अचानक परवा दिवशी राष्ट्रवादीनेच शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आता या निर्णयामुळे पंकजा मुंडे यांच्या समोर मोठा पेज निर्माण झाला आहे कारण पंकजा मुंडे यांचे प्रमुख विरोधी असलेले धनंजय मुंडे यांनी सुद्धा अजित पवारांसोबत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय घेत मंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे आता पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

पंकजा मुंडे या आपल्याच पक्षावर नाराज असल्याची सुद्धा चर्चा अनेक वेळा झाली आहे. भाजप या आपल्याच पक्षाकडून पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय केला जात असल्याच्या अनेक प्रतिक्रिया पंकजा मुंडे समर्थकांकडून अनेक वेळा व्यक्त केल्या आहेत. आता राजकीय विरोधक असलेले राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आल्यामुळे पंकजा मुंडे काय निर्णय घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे..

Updated : 5 July 2023 7:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top