Home > Political > करूणा मुंडे यांच्यापेक्षा नोटा ला १५ पट जास्त मतं...

करूणा मुंडे यांच्यापेक्षा नोटा ला १५ पट जास्त मतं...

कोल्हापूरच्या लोकांची करूणा मुंडेंपेक्षा नोटाला पसंती

करूणा मुंडे  यांच्यापेक्षा नोटा ला १५ पट जास्त मतं...
X

महिन्याभरापासून कोल्हापूर मध्ये विधानसभा पोटनिवडणुकीचा धुरळा सुरू होता. या निवडणुकीचा आज निकाल लागतोय. काँग्रेस उमेदवार जयश्री पाटील यांनी ९२ हजारापेक्षा जास्त मतं मिळवत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत जयश्री जाधव यांच्यासह आणखी १४ जणांनी कोल्हापूर उत्तर विधानसभेची निवडणूक लढवली होती.यात मविआ कडून काँग्रेस, भाजप, लोकस्वराज्य, वंचित बहूजन आघाडी, राष्ट्रीय समाजवादी पार्टी आणि एतर १० अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरला होता. यामध्ये धनंजय मुंडे यांच्या पत्नी म्हणवणाऱ्या करूणा मुंडे यांचा देखील समावेश होता.

नोटाला पडली अधिक मतं

करूणा मुडे या कायम या ना त्या मार्गाने चर्चेत असतात. करूणा मुंडे यांनी या निवडणुकीत स्वतःच्या शिवशक्ती या नव्या पक्षाची स्थापना केली. निवडणुकही लढवली. पण त्यांना कोल्हापूर करांची मन काही जिंकता आलेली नाहीत असं दिसतंय. प्रचाराच्या रणधुमाळीत देखील त्या कुठेच दिसल्या नाहीत. याचाच परिणाम त्यांच्या मतांवर झाला. या निवडणूकीत त्यांना पडलेल्या मतांपेक्षा १८ पट जास्त मतं नोटाला पडलेली आहेत. करूणा मुंडेंना १३३ मतं पडली आहेत आणि नोटा ला १७८८ मतं मिळाली आहेत.

प्रत्येक निवडणूक लढवण्याचा निर्णय

आगामी लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पोटनिवडणुका अशा सर्व निवडणुका लढवण्याचे शर्मा यांनी पक्षाची घोषणा करतेवेळी जाहीर केले आहे. या निवडणुकांमध्ये शिवशक्ती पक्षाचे उमेदवार मैदानात असतील. याची सुरवात कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतून त्यांनी स्वतः मैदानात उतरून केली.इतर ठिकाणी पक्ष उमेदवार उभा करणार आहे. योग्य उमेदवार न मिळाल्यास स्वत: निवडणूक लढवण्याची तयारीही त्यांनी दाखवली आहे.

Updated : 16 April 2022 10:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top