Home > कोणत्याही प्रवासीचा मृत्यू भुकेने न झाल्याचा पीयुष गोयल यांचा दावा

कोणत्याही प्रवासीचा मृत्यू भुकेने न झाल्याचा पीयुष गोयल यांचा दावा

कोणत्याही प्रवासीचा मृत्यू भुकेने न झाल्याचा पीयुष गोयल यांचा दावा
X

लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजूरांना स्वगृही परतण्यासाठी अनेक राज्यांमधून श्रमिक रेल्वेंची सोय करण्यात आली. पण या रेल्वे प्रवासात मजूरांना अन्न आणि पाण्याची व्यवस्था नसून अनेक प्रवासींचा मृत्यू झाल्याची टीका विरोधकांकडून केली जातेय. सोबतच नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ ट्रेन पोहोचल्या नाहीत आणि काही ट्रेन मार्ग चुकल्या असल्याचही म्हटलं जात आहे. यावर उत्तर देताना केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल (Piyush Goyal) यांनी कोणत्याही प्रवासीचा भुख आणि तहानेने मृत्यू झाला नसल्याचं ठामपणे म्हटलं आहे.

हे ही वाचा...

काही दिवसांपुर्वी गुजरातमधून निघालेल्या श्रमिक ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या महिलेचा भुक आणि गरमीने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मुझफ्फरपुर रेल्वे स्थानकावर मृत आईच्या शेजारी लहान मुल तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडिय़ावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. देशभरातून या घटनेवर हळहळ व्यक्त करण्यात आली होती. मात्र, रेल्वेमंत्र्यांनी एकाही प्रवासीचा मृत्यू झाला नसल्याचे ठामपणे सांगितले आहे.

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/267307381056280/

पीयुष गोयल यांनी ट्वीट करुन असा दावा केलाय की, “देशात कोणत्याही रेल्वेगाडीला पोहोचण्यासाठी ७ वा ९ दिवस लागलेले नाहीत. त्याचबरोबर एकाही प्रवाशाचा मृत्यू जेवण अथवा पाणी न मिळाल्यामुळे झालेला नाही. रेल्वे प्रवाशांना १.९ कोटी रूपयांपेक्षा अधिक जेवण व १.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त पाण्याच्या बॉटल रेल्वेद्वारे पुरवण्यात आले. रेल्वे मार्गातील अडथळ्यांमुळे काही रेल्वेगाड्या वळवण्यात आल्या. ज्याचं प्रमाण एकूण रेल्वेगाड्यांच्या तुलनेत १.७५ टक्के इतकंच आहे.”

Updated : 2 Jun 2020 4:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top