Home > Political > "भारताच्या मागच्या 100 वर्षात कधी झाला नाही असा अर्थसंकल्प" अमृता फडणवीसांनी केलं बजेटचं कौतुक

"भारताच्या मागच्या 100 वर्षात कधी झाला नाही असा अर्थसंकल्प" अमृता फडणवीसांनी केलं बजेटचं कौतुक

भारताच्या मागच्या 100 वर्षात कधी झाला नाही असा अर्थसंकल्प अमृता फडणवीसांनी केलं बजेटचं कौतुक
X

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी 2021-22 या आर्थीक वर्षाचा अर्थसंकल्प आज जाहिर केला. या अर्थसंकल्पावर सध्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. पण अमृता फडणवीस यांनी "भारताच्या मागच्या शंभर वर्षात कधी झाला नाही असा अर्थसंकल्प" अशा शब्दात या अर्थसंकल्पाचं कौतुक केलं आहे.

"भारताच्या मागील १०० वर्षांत असं अर्थसंकल्प सादर झालेलं नाही. हे अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार. वाढीव कर लावल्याशिवाय देशाच्या प्रगतीस चालना कशी दिली जाऊ शकते हे आता जगातील सर्व देश बघतील आणि शिकतील ,' असं अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे.


Updated : 1 Feb 2021 2:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top