Home > Political > मुख्यमंत्री नाही निदान मंत्रिमंडळात तरी महिला असाव्यात..

मुख्यमंत्री नाही निदान मंत्रिमंडळात तरी महिला असाव्यात..

आजपर्यंत महाराष्ट्राने महिला मुख्यमंत्री पहिल्या नाहीत. राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे. या नवीन सरकार मध्ये आता 17 महिला आमदार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री नाही निदान या सरकार मध्ये महिलांकडे महत्वाची खाती देत मंत्रिमंडळात त्यांना जास्त संख्येने संधी देणार का?

मुख्यमंत्री नाही निदान मंत्रिमंडळात तरी महिला असाव्यात..
X

पुरोगामी महाराष्ट्राला आजपर्यंत एकही महिला मुख्यमंत्री मिळाल्या नाहीत. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत इतक्या वर्षात एकही महिला मुख्यमंत्री का झाल्या नाहीत? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण हे सत्य आहे. आजपर्यंत कुठल्याच पक्षाला महिला मुख्यमंत्री असाव्या असं वाटलं नाही का? की महिला मुख्यमंत्रीपद सांभाळण्यास सक्षम नाहीत?

महिला सक्षम नाहीत असं आपण म्हणूच शकत नाही. कारण शशिकला काकोडकर, अन्वरा तैमूर, जानकी रामचंद्रन, जयललिता, राबडीदेवी, शीला दीक्षित, वसुंधरा राजे, मेहबुबा मुफ्ती, ममता बॅनर्जी या महिलांनी ही जबाबदारी अगदी सक्षमपणे सांभाळली आहे. मग महाराष्ट्रातच आज पर्यंत महिला मुख्यमंत्री का झाल्या नाहीत? हा प्रश्न आहेच.

सध्याचे राज्याचं राजकारण पाहिलं तर मागच्या काही दिवसांपासून रंगलेल्या सत्तानाट्यानंतर आता राज्यात नवीन सरकार स्थानप झाले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे. भारतीय जनता पक्षाने शिंदे गटाला पाठिंबा दिला व एकनाथ शिंदे हे राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत. त्यामुळे यावेळी देखील महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळाल्या नाहीत. आता महिला मुख्यमंत्री तर होऊ शकल्या नाहीत निदान महिलांना महत्वाची खाती देत मंत्रिमंडळात तरी स्थान मिळेल का?

महिला आमदार आहेत तरी किती?

2019 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत 25 महिला आमदार निवडून आल्या. 2014 ला झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत महिला आमदारांची संख्या यावेळी वाढलेली पाहायला मिळाली. यामध्ये भाजपच्या बारा, काँग्रेसच्या पाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन, तर शिवसेनेच्या दोन महिला आमदार निवडून आल्या. या निवडणुकांमध्ये एकूण 235 महिला उमेदवार रिंगणात होत्या. यातील 22 महिला या विधानभवनात पोहोचल्या. निवडणुका झाल्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं आणि या सरकारमध्ये यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड व अदिती तटकरे या तीन महिलांचाच मंत्रिमंडळात समावेश झाला.

आता महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि काल राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. आणि यावेळी देखील महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री नाही निदान मंत्रिमंडळात तरी महिलांना स्थान मिळणार का? आणि मिळालंच तर त्यांना महत्वाच्या पदांचा कार्यभार देणार का? याही गोष्टी आता पहाव्या लागतील.

नवीन सरकार मध्ये किती महिला आमदार..

तर सध्या शिवसेनेतील बंडखोर गट व भाजप असे मिळून राज्यात नवीन सरकार स्थापन झाला आहे. या सरकारमध्ये असलेल्या महिला आमदारांची संख्या पाहिली तर शिंदे गटासोबत चार महिला आमदार आहेत. त्यामध्ये यामिनि जाधव, लता सोनवणे, किशोरी पाटील व अपक्ष आमदार गीता जैन यांचा सहभाग आहे. तर भाजपमध्ये 13 महिला आमदार आहेत. या दोन्ही गटाचे मिळून एकूण 16 महिला आमदार हा नवीन सरकार मध्ये असणार आहेत. यातील किती महिलांना मंत्रिमंडळात संधी मिळणार हे पाहावं लागेल.

विधानसभेतील महिला आमदार..





Updated : 1 July 2022 2:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top