Home > Political > ''चंद्रशेखर बावनकुळे यांनी बायको पळवून आणली..'' नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट

''चंद्रशेखर बावनकुळे यांनी बायको पळवून आणली..'' नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट

चंद्रशेखर बावनकुळे यांनी बायको पळवून आणली.. नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट
X

"बावनकुळेंनी बायको कशी पळवून आणली, त्यांनी कसं केलं ते तुम्हाला आता एकट्यात सांगतील. तरुणांसाठी ते गुपीत उपयोगाचे आहे. पण, ज्येष्ठांनी या भानगडीत पडू नये.", असं म्हणत माजी मंत्री नितीन गडकरी यांनी बावनकुळे यांचा यांच्या लग्नाचा किस्सा सांगितला आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचा वसंतराव देशपांडे सभागृहात सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात काल नितीन गडकरी देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी बावनकुळे यांच्या जीवनातील हा मजेशीर किस्सा सांगितला आहे.

राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नुकतीच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड निवड केली. चंद्रकांतदादा पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. याच नियुक्ती नंतर त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरी देखील उपस्तित होते. यावेळी बोलताना त्यांनी ''बावनकुळे यांनी आपल्या कर्तृत्वातून ही जागा मिळवली आसून अगदी रिक्षा चालकापासून त्यांनी आपला जीवनप्रवास सुरु केला. तिथून त्यांनी त्यांच्या जीवनाची सुरवात केली. त्यांनी त्यांची बायको देखील पळून आणली. मी जास्त काही सांगत नाही. त्यांनी हे कसं केलं हे ते तुम्हाला एकट्यात सांगतील. त्यांचं हे गुपित तरुण कार्यकर्त्याच्या उपयोगाचं आहे.'' गडकरींनी हा बावनकुळेंच्या लग्नाचा किस्सा सांगितल्यानंतर मंचावर एकच हशा पिकला. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेक पदाधीकारी उपस्थित होते..

Updated : 14 Aug 2022 3:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top