Home > Political > Sheetal Mhatre l युवासेनेच्या प्रमुखांना चौकशीला बोलावून सोक्षमोक्ष करा..

Sheetal Mhatre l युवासेनेच्या प्रमुखांना चौकशीला बोलावून सोक्षमोक्ष करा..

Sheetal Mhatre l  युवासेनेच्या प्रमुखांना चौकशीला बोलावून सोक्षमोक्ष करा..
X

शीतल म्हात्रे यांच्या व्हिडिओची छेडछाड करून त्यांना बदनाम करण्याचा कट रचला गेला. त्यानंतर पोलिसांनी योग्य कारवाई करून विशाखा राऊत यांचे जावई गुरुनाथ दुर्ग त्यांच्यावरती कारवाई झाली. महिलांना बदनाम करणारी प्रचंड मोठी साखळी आहे, चैन आहे. महिलाला बदनाम करणं हा एक मोठा उद्योग झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. साईनाथ दुर्गे ह्यांना अटक झाल्यानंतर त्यांची काही लोकं शीतल म्हात्रे या आपल्या आईच्या घराकडून विधानभवनाकडे येत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी दोन तरुण सतत पाठला करत होते. त्यांचा जो अंगरक्षक होता ह्या अंगरक्षकाच्या हे लक्षात आलं की bike वरून कोणीतरी आपला पाठलाग करतंय आणि म्हणून त्यांनी शंभर number ला phone केला आणि तिकडनं police संरक्षण सुद्धा मागवलं आणि त्यानंतर संध्याकाळी दादर police station तक्रार दाखल केली. या सगळ्या प्रकरणावरून शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी काल सभागृहात आवाज उठवला व थेट युवासेनेवर गंभीर आरोप केले.

सभागृहात बोलताना ते म्हणाले की, तक्रार केल्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई केली आणि दोन तरुणांना पकडले. हे तरुण सिद्धिविनायक सिद्धिविनायक मंदिरामध्ये नोकरी करणारे कंत्राटी कामगार आहेत. हे सुद्धा त्या विभागाच्या ज्या नगरसेविका आहेत विशाखा राऊत यांनी त्यांना नोकरीवरती लावलेलं आहे. मागे जो संदीप देशपांडेंवरती हल्ला झाला. तो सुद्धा भारतीय माथाडी सेनेचे जे काही कर्मचारी आहेत. यांच्या माध्यमातनं करण्यात आला. आत्ता जो काल पाठलाग करण्यात आला तो भारतीय युवा सेनेच्या माध्यमातनं करण्यात आला. ही जी काही बेरोजगार मुलं आहेत, या बेरोजगार मुलांना कुठेतरी कंत्राटी नोकरीला लावायचं आणि त्यांच्या माध्यमातनं असे गुन्हे करायला लावायची अशा प्रकारची एक प्रवृत्ती वाढीस घातलेली आहे. मला विनंती करायची आहे. अशा प्रवृत्तीचा आपण योग्य त्याच्यावरती कारवाई करावी अशीमागणी शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी केली.

युवा सेनेचे प्रमुख आहेत त्यांना चौकशीला बोलवा...

आमदार नितेश राणे यांनीदेखील या प्रकरणावरून थेट युवासेनेवर बोट ठेवत. युवा सेनेच्या प्रमुखांनाच चौकशीला बोलावून शोक्षमोक्ष लावण्याची मागणी केली. काल सभागृहात बोलताना ते म्हणाले की, अध्यक्ष महोदय आपण कधी ना कधी या प्रकरणाच्या mastermind कडे लक्ष घालणार आहोत का? कोणाच्या आदेशावर हे सगळे कार्यकर्ते काम करतायेत? हे युवा सेनाचे प्रमुख कोण आहेत? हे माथाडी संघटनेचे प्रमुख कोण आहेत? कोण हे सगळं या तरुणांना आदेश देतात त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे ना? आपण नेहमी या खालच्या तरुणांना अटक करत बसणार आहे का? म्हणून आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो हे जे कोण युवा सेनेचे प्रमुख आहेत त्यांना कुठेतरी चौकशीला बोलवा. संघटनेचे प्रमुख आहेत त्यांना चौकशीला बोलावून सोक्षमोक्ष लावण्याची मागणी त्यांनी केली...


Updated : 16 March 2023 1:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top