Home > Political > नितेश राणेंचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

नितेश राणेंचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

नितेश राणेंचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
X

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक भक्तजन आपापल्या गावी जात आहेत .पण "ज्या पद्धतीने कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची आम्ही सेवा करतो, त्या पद्धतीने कोणताच पक्ष गणेश भक्तांची सेवा करत असेल,असं मला वाटत नाही."असं मत नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे . त्याचबरोबर ठाकरे सरकारच्या काळात हिंदू सणांवर बंधने आणली होती.असा गंभीर आरोप सुद्धा नितेश राणे यांनी केला .

त्याचबरोबर नितेश राणे यांनी सुप्रिया सुळें वर सुद्धा निशाणा साधला आहे .'सुप्रिया ताईंनी सगळ्या बाबतीत सल्ला मसलत करण्यापेक्षा आपल्या घरात कोण किती भ्रष्टाचार करत याचं स्पष्टीकरण द्यावे कारण ईडील लहान मुलांची नर्सरी नाही.कुणालाही नाही आवडलं तर चॉकलेट हातात द्यायची , त्यांच्याकडे काही पुरावे आहेत त्यामुळे ते नोटिसा पाठवत असतात. त्यामुळे रोहित पवारांनी रशिया युक्रेन बद्दल बोलण्यापेक्षा त्यांच्या बुडाखाली किती आग लागली आहे ते पाहावं 'अशा शब्दात नितेश राणे यांनी टीका केली आहे . त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावर सुद्धा नितेश राणे यांनी पलटवार केला. अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी देण्याचा सल्ला दिला असून त्यांनी आपल्या पक्षाकडे पहावं आम्हाला सल्ले देऊ नये असे नितेश राणे यांनी सांगितले आहे

Updated : 29 Aug 2022 11:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top