Home > Political > आरूनफिरून राजकारण बाईवर का?

आरूनफिरून राजकारण बाईवर का?

आरूनफिरून राजकारण बाईवर का?
X

एकीकडे महिलांचा सन्मान झाला पाहिजे म्हणून बरळणारे राजकारणी आणि दुसरीकडे आई बहिणींवरून बोलणारे हेच राजकारणी . राजकारण करताना स्वतःच्या सुखासाठी आणि चैनीसाठी निवडून आलेलं एकीकडे आणि वारसाहक्काने राजकारणात प्रवेश करणारे एकीकडे .आपल्या सामान्य माणसांच्या तोंडाची हीच वाक्य आहेत , कुणाच्या पण नादी लागा पण राजकारण्याच्या नको ...असं का ?

कारणे पाहावीत तेवढी थोडीच आहेत . कसबा पोटनिवडणुकीत प्रचारादरम्यान अजितपवारांनी नारायण राणेंची खिल्ली उडवली ... त्यांचा शब्द होता कि "शिवसेना पक्ष फोडणाऱ्या सर्वांचा पुढील निवडणुकीत जनतेने पराभव केला. नारायण राणे तर दोनवेळा पडले. एकदा कोकणातून त्यांचा पराभव झाला. तर दुसऱ्यावेळी वांद्रे मतदारसंघात एका बाईने नारायण राणेंना पाडलं, "एका बाईने नारायण राणेंना पाडलं" ... म्हणजे बाईकडून हरणं ही ती स्वतः राजकारणी असताना वेगळी गोष्ट कुठे ठरतेय ?पण एखादा पुरुष बाईकडून हरला म्हणजे तो नामर्द ठरतो का? कि इथं एखाद्या पुरुषाचं पुरुषत्व कमी पडतं ... म्हणजे पुन्हा अरूनफिरून हेच कि ती एक बाई आहे .आणि हा एक पुरुष.लाखो आणि करोडोमध्ये समर्थक असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी सडेतोड बोलणं ,खऱ्या मुद्यावर बोट ठेवणं योग्यच पण नकळत पण रुजणारा "बाईबद्दलचा " भेदभाव आलाच ...

आता आपल्या बापाला बोलले म्हंटल्यावर ,मुलाचं रक्त सळसळणार नाही असं होणारच नाही ... निलेश राणे यांनी तर ट्विट केलं असं ट्विट ज्यातील शब्द ...एका आई ,बाई ,बहीण ,बायको ,मैत्रीण सगळ्याच नात्यांना लाजवेल असे...फरक इतकाच ते बाईवरून बोलले हे आईवर आले ...

शेवटी बाईवरून बोललं कि प्रत्येकातला पुरुषार्थ जागा होतो ... आणि चघळले जातात हेच विषय समाजमाध्यमांपासून ते टीव्ही च्या हेडलाईन पर्यंत ... बायकांना राजकारणात पदं नाहीत पण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायला ,एकमेकांची खिल्ली उडवायला पुरुष राजकारनी बायकांना फार मोठं स्थान देतात एवढं मात्र नक्की ... शेवटी राजकारणात बाई नाही पण बाईवर चालणार राजकारण मात्र चांगलं चालत ...

Updated : 24 Feb 2023 11:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top