Home > Political > चंद्रकांत पाटलांचे विधान ऐकून मला धक्का बसला - नीलम गोऱ्हे

चंद्रकांत पाटलांचे विधान ऐकून मला धक्का बसला - नीलम गोऱ्हे

चंद्रकांत पाटलांचे विधान ऐकून मला धक्का बसला - नीलम गोऱ्हे
X

शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी, "भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्यसभेच्या निवडणुकी संदर्भात केलेले वक्तव्य बिनबुडाचे असून, व्हिपचा कायदा निवडणूक आयोगाने तयार केलेला आहे. भाजपाने असा स्वतंत्र कायदा तयार केला असेल तर मला माहित नाही." असं म्हणत आपण आपल्या आमदाराला संभाळावे ही जुनी परंपरा आहे, यावर आजपर्यंत कोणीच आक्षेप घेतला नाही. त्यामुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी, एखाद्या आमदाराने कोणाला मत दिले आहे हे व्हीपला दाखवले व ते त्यांचा पक्षाला केलेलं नसेले तरी व्हीप कारवाई करू शकत नाही असं विधान त्यांनी केलं होतं.

या पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, गेल्या काही काळामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महिला अत्याचाराच्या घटना कमी झाल्या पाहिजे. त्या दृष्टिकोनातून पोलिस प्रशासनाच्या सोबत आढावा बैठक घेऊन यावर उपाययोजना करण्यात येणार आहे. दामिनी पथक, भरोसा सेल, दक्षता विभाग, यानंतर आता दक्षता कमिटीच्या माध्यमातून महाविद्यालय, शाळा,मध्ये विद्यार्थी पोलीस ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार हे नशेच्या गोळ्यांच्या माध्यमातून होत असल्याची प्राथमिक माहिती सुद्धा मिळाली असेल तर त्या संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली. यावेळी त्यांनी गंगापूर खुलताबाद वैजापूर या जिल्ह्याच्या रोजगार हमी योजनेच्या कामाची सुद्धा पाहणी करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.



Updated : 4 Jun 2022 8:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top