Home > Political > जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्यावर नीलम गोऱ्हे आक्रमक

जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्यावर नीलम गोऱ्हे आक्रमक

जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्यावर नीलम गोऱ्हे आक्रमक
X


देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही. महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर लागली आहे. काँग्रेसचेही अनेक राज्यांतून गाशा गुंडाळणे सुरू आहे. उर्वरित सर्व पक्षही संपतील. देशात केवळ भाजप राहील, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी येथे केला. यावर विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेचे उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

दरम्यान यावर शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रीया दिली आहे त्या म्हणाल्या की.. जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा रात किड्यांना अस वाटत की सूर्य हा कायमचा संपला आहे. पण सकाळ झाल्यावर त्यांच्या ते लक्षात येत. असा टोला गोऱ्हे यांनी जे. पी. नड्डा यांना लगावला आहे. पुण्यात अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी त्या बोलत होत्या. अश्या लोकांना बोलायचा अधिकार नाही. अस म्हणत भाजप नेते जे. पी. नड्डा यांना फटकारल.

Updated : 1 Aug 2022 11:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top