Home > Political > मनसेच्या नालायक कार्यकर्त्यांनी माझ्या पेजवर येऊ नका, रूपाली ठोंबरे भडकल्या...

मनसेच्या नालायक कार्यकर्त्यांनी माझ्या पेजवर येऊ नका, रूपाली ठोंबरे भडकल्या...

मनसेच्या नालायक कार्यकर्त्यांनी माझ्या पेजवर येऊ नका, रूपाली ठोंबरे भडकल्या...
X

पूर्वाश्रमीच्या मनसेच्या आणि आता राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील या सातत्याने त्यांच्या फेसबुक पेजवर लाईक घेत असतात. या ना त्या विषयावर त्या त्यांची मतं फेसबुक वर सातत्याने मांडत असतात. त्यांच्या व्हिडिओज वर त्यांचे चाहते असतील किंवा इतर पक्षाचे काही कार्यकर्ते असतील किंवा काही मंडळी असतील अक्षरशः कमेंट्सचा पाऊस पाडतात. इतर पक्षांचे कार्यकर्ते त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करत असतात. त्यामध्ये काही अश्लील प्रतिक्रियांचा देखील समावेश असतो. अशाच अश्लिल प्रतिक्रीया देणार्यांपवर काही दिवसांपूर्वी रुपाली ठोंबरे पाटील यांनी कायदेशीर कारवाई केली होती.

शनिवारी ७ मे ला रुपाली पाटील ठोंबरे या पुन्हा एकदा फेसबुक वर लाईव्ह आल्या होत्या. या लाईव्ह मध्ये त्यांनी मनसेच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना पुन्हा माझ्या फेसबुक पेजवर येऊ नका अशी चेतावणी दिलेली आहे. असे म्हणताना त्यांनी मनसेच्या आणि भाजपच्या नालायक कार्यकर्त्यांनी माझ्या फेसबुक पेज वर येऊ नका अन्यथा कारवाई केली जाईल. महागाई वाढली असताना तुम्ही भोंग्याचं जे राजकारण करत आहात ते खूप गलिच्छ आहे.

इतकंच नाही तर काही जण त्यांचे व्हिडीओ एडीट करून ट्रोल करण्यासाठी वापरतात. अशांना देखील त्यांनी खडसावलं आहे. पुन्हा माझे व्हिडिओज तुम्ही एडीट करून इतर गोष्टींसाठी वापरले आणि मला दिसले तर त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा धमकी वजा इशाराच त्यांनी मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे.

Updated : 7 May 2022 10:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top