Home > Political > चंद्रकांत दादा जेवणाचे आमंत्रण देते; सहकुटूंब या, विद्या चव्हाण करणार पाहुणचार

चंद्रकांत दादा जेवणाचे आमंत्रण देते; सहकुटूंब या, विद्या चव्हाण करणार पाहुणचार

चंद्रकांत दादा जेवणाचे आमंत्रण देते; सहकुटूंब या, विद्या चव्हाण करणार पाहुणचार
X

बुधवारी मंत्रालयाच्या दिशेने भाजपने काढलेल्या मोर्च्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर राजकारण सोडा, घरी जा आणि स्वयंपाक करा अशी टीका केली त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी टीका करत सहकुटूंब जेवणाचे निमंत्रण दिलं आहे.

गेल्या काही काळापासून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमधील OBC आरक्षणाचा प्रश्न रखडला होता. यामुळे दोन्ही राज्यांमधील निवडणुका रखडल्या होत्या. काही दिवसांपुर्वी मध्य प्रदेशमधील OBC आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने सोडवला होता. महाराष्ट्राचा प्रश्न अजुनही प्रलंबितच आहे. यावरच बुधवारी वाय. बी. चव्हाण सभागृहात भरलेल्या राष्ट्रवादीच्या OBC अधिवेशनात खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिल्लीत अशी कुणाची भेट घेतली की त्यांचा प्रश्न निकाली लागला असा सवालच विचारला होता.

त्यावर प्रतिक्रीया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. त्यावर त्यांनी सुप्रिया सुळेंना " राजकारण सोडा आणि घरी बसा, जेवण करा किंवा दिल्लीत जा नाही तर मसणात जा पण आम्हाला आरक्षण द्या", अशी टीका त्यांनी केली होती. त्यांच्या टीकेवरून आता राज्यभरात राम पेटलं आहे.

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष तसेच ज्येष्ठ नेत्या विद्या चव्हाण यांनी त्यांना थेट जेवणाचं आमंत्रणच दिलं आहे. त्या म्हणाल्या आहेत, "बाई कष्टते राबते तव्हा भाकर फुगते, माय होऊनी जगाची नाळे वाट जगविते @ChDadaPatil तुम्हाला जेवणाचे आमंत्रण देते. सहकुटुंब अवश्य या."

चंद्रकांत पाटील विद्या चव्हाणांचं हे आमंत्रण स्विकारतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Updated : 26 May 2022 4:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top