Home > Political > ''बापाच्या जीवावर मोठे झाले'' असं म्हणत विद्या चव्हाण यांनी निलेश राणेंची काढली अक्कल..

''बापाच्या जीवावर मोठे झाले'' असं म्हणत विद्या चव्हाण यांनी निलेश राणेंची काढली अक्कल..

बापाच्या जीवावर मोठे झाले असं म्हणत विद्या चव्हाण यांनी निलेश राणेंची काढली अक्कल..
X

निलेश राणे यांच्या ट्विट वर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी टीका केलेय. निलेश राणे कोण आहेत त्यांना आम्ही ओळखत नाही. अजित पवार दिवसरात्र काम करणारे नेते आहेत. असे वक्तव्य विद्या चव्हाण यांनी केलं आहे. राणे आपल्या बापाच्या जीवावर मोठे झालेले लोक, त्यांना स्वतःची अक्कल नाही. तसेच भाजपमध्ये ज्या बरळणाऱ्या लोकांना घेतले आहे त्यात नारायण राणेंचे दोन मुलं अग्रेसर आहेत अशी टीका देखील विद्या चव्हाण यांनी केली.

निलेश राणे यांनी अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडिया सारखे गायब होतात असे ट्विट केले होते. यावरून विद्या चव्हाणांनी ही टीका केली आहे.

Updated : 13 Jun 2022 7:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top