Home > Political > 'शिल्पकार टक्केवारीचे',चाकणकरांची पुण्यातील सत्ताधारी भाजपवर टीका

'शिल्पकार टक्केवारीचे',चाकणकरांची पुण्यातील सत्ताधारी भाजपवर टीका

शिल्पकार टक्केवारीचे,चाकणकरांची पुण्यातील सत्ताधारी भाजपवर टीका
X

NCP leader Rupali Chakankar criticizes Pune Municipal Corporation

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे.पुण्यातील खडकवासला धरणातून रात्री उशिरा पंचवीस हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डेक्कन येथील भिडे पूलवर जलपर्णी अडकल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती,यावरून राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकार यांनी पुणे महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या भाजपवर टीका केली आहे.

चाकणकर यांनी ट्विट करत म्हंटले आहे की,पुण्यातून विकास वाहून जात असतांना भिडे पुलाला अडकला, कदाचित या जलपर्णीला काढण्यासाठी खर्च केलेली कोट्यवधींची बिले ठेकेदाराला मिळाल्याशिवाय जाणार नाही असा पवित्रा तर घेत नसतील ना या जलपर्णी?,असे म्हणत 'शिल्पकार टक्केवारीचे',असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी भाजपला लगावला.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या खडकवासला धरण साखळीत देखील जोरदार पाऊस सुरू आहे. तर मागील चोवीस तासांत पाच टीएमसी एवढा पाऊस झाला आहे. यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात २ हजार ५५३ इतका सुरू असल्याचे पाटबंधारे विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

Updated : 24 July 2021 2:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top