Home > Political > 'दादा', चंद्रकांत पाटलांवर करमणूक कर लावा, रुपाली चाकणकरांचा खोचक टोला

'दादा', चंद्रकांत पाटलांवर करमणूक कर लावा, रुपाली चाकणकरांचा खोचक टोला

दादा, चंद्रकांत पाटलांवर करमणूक कर लावा, रुपाली चाकणकरांचा खोचक टोला
X

भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुरु असलेले आरोप-प्रत्यारोप काही थांबायला तयार नाहीत. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या एका टीकेमुळे वाद आणखीच चिघळला आहे. तर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी खिल्ली उडवली आहे. अजित पवारांनी आता चंद्रकांत पाटलांवर करमणूक कर लावावा, असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला.

'देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीस यांच्या वयावर जाऊ नका', असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावर बोलतांना चाकणकर यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्याला निखळ मनोरंजन होत आहे. महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजित दादांना माझी विनंती आहे की त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा. भाजप सरकार महाराष्ट्राचे हक्काचे GST चे पैसे देत नाही निदान यांच्यावरील करमणूक करामुळे सरकारचा काही भार तरी हलका होईल.

Updated : 20 Sep 2021 12:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top