Home > Political > नवाब मलिक स्पष्ट बोलतात म्हणून त्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न, रूपाली चाकणकरांची टीका

नवाब मलिक स्पष्ट बोलतात म्हणून त्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न, रूपाली चाकणकरांची टीका

नवाब मलिक स्पष्ट बोलतात म्हणून त्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न, रूपाली चाकणकरांची टीका
X

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी पहाटे अंमलबजावणी संचालनालय ED ने चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यावर राज्य महिला आयृगाच्या अध्यक्षा तसेच राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रूपाली चाकणकर यांनी ईडी वर टीका केली आहे.

"केंद्रीय यंत्रणांची मनमानी गेले काही महिने महाराष्ट्रात सुरु आहे त्याचा पुढचा अंक म्हणून राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री मा.नवाबजी मलिक साहेब यांच्यावरील कारवाईकडे पाहता येईल.

केवळ राजकीय सूडबुद्धीने संबंधित व्यक्तीच नाही तर त्या व्यक्तीच्या नातेवाईकांची सुद्धा ईडी चौकशी करते. मा.नवाबजी मलिक सातत्याने इडी,एनसीबी वगैरेंच्या विरोधात निडरपणे बोलताहेत, त्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे.

परंतु मा.नवाबजी मलिक किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अशा कारवायांनी दबून जाणार नाही. ईडी ला चौकशी करायची असू शकते परंतु राज्याच्या मंत्र्याच्या घरी पहाटे ईडी ची टीम जाते, यावरून त्यांचा हेतू दिसून येतो.विशेष म्हणजे भाजपाच्या एकाही व्यक्तीच्या विरोधात ईडीची कारवाई नाही.", अशा शब्दात त्यांना ईडीवर तसेच भाजपवर ताशेरे ओढले आहेत.

Updated : 23 Feb 2022 7:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top