Home > Political > Happy Birthday: "पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं"

Happy Birthday: "पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं"

रोहित पवार यांचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत खोचक टोला

Happy Birthday: पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं
X

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डीझेलच्या दरात सतत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील अनेक राज्यात पेट्रोलच्या दराने शंभरी पार केलं आहे. याच पेट्रोलच्या दरवाढीवरून राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत खोचक टोलाही लगावला आहे.

रोहित पवार यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, "देशाची तिजोरी सक्षमपणे सांभाळणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सितारमण जी आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपण पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं आणि त्यासाठी आपणास उत्तम आरोग्य लाभावं, ही प्रार्थना!," असा टोला रोहित पवारांनी लगावला.

आधीच कोरोनाने सर्वसामन्य नागरिक हतबल झाले असताना, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ सुरूच आहे. त्यातच घरघुती गॅसच्या दरातसुद्धा वाढ पाहायला मिळत आहे. मंगळवारी घरघुती गॅस सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईमुळे नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

Updated : 18 Aug 2021 8:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top