Home > Political > स्वत:ला शरद पवार यांचा मानसपुत्र सांगुन राष्ट्रवादीचा नेता करायचा बलात्कार

स्वत:ला शरद पवार यांचा मानसपुत्र सांगुन राष्ट्रवादीचा नेता करायचा बलात्कार

पीडितेने तृप्ती देसाईंच्या मदतीने पत्रकार परिषदेत केला आरोप

स्वत:ला शरद पवार यांचा मानसपुत्र सांगुन राष्ट्रवादीचा नेता करायचा बलात्कार
X

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून महिला अत्याचाराचे गंभीर आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांवर लागले. एकामागोमाग एक प्रकरण शांत होत नाही त्यात आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा आणखी एक नेत्याने परभणी येथे एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी पीडितेसह तृप्ती देसाई यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

परभणीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश विटेकर यांनी माझे अश्लील व्हीडिओ तयार करुन माझ्यावर वर्षभर अत्याचार केले. मी या सगळ्याविरोधात तक्रार केली होती. माझ्याकडे सर्व पुरावेही आहेत. पण मला केवळ तपास सुरु असल्याचे सांगितले जाते. तर राजेश विटेकर यांनी शरद पवार यांच्या पाठबळामुळे माझ्यावर गुन्हा दाखलच होणार नाही, असे सांगून मला घाबरवल्याचे या पीडित महिलेले म्हणणे आहे.


Updated : 1 April 2021 3:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top