Home > Political > तब्बेत खालावल्याने नवनीत राणा लीलावती रुग्णालयात..

तब्बेत खालावल्याने नवनीत राणा लीलावती रुग्णालयात..

तब्बेत खालावल्याने नवनीत राणा लीलावती रुग्णालयात..
X

खासदार नवनीत राणा या मागील बारा दिवसांपासून कारागृहात होत्या. आता बेल मिळाल्यानंतर त्यांची कारागृहातुन सुटका झाली आहे. जेल मधून बाहेर येताच नवनीत राणा यांना थेट लीलावती रुग्णालय नेण्यात आले आहे. त्यांच्या छातीत दुखत असल्याचे म्हंटले जात आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले आहे. मागील बारा दिवसांपासून त्या भायखळा जेल मध्ये होत्या. बारा दिवसानंतर आज त्या जेल मधून बाहेर आले आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री बाहेर हनुमान चालीसा म्हणणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे मागील बारा वर्षांपासून राणा दांपत्य कारागृहात होते. आता त्यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांची जेलमधून सुटका करण्यात आली आहे.
Updated : 5 May 2022 9:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top