Home > Political > "एवढं मोठं आंदोलन करणं शेतकऱ्यांच्या मनात नव्हतं, मात्र राजकीय पक्षांमुळे एवढं झालं."

"एवढं मोठं आंदोलन करणं शेतकऱ्यांच्या मनात नव्हतं, मात्र राजकीय पक्षांमुळे एवढं झालं."

एवढं मोठं आंदोलन करणं शेतकऱ्यांच्या मनात नव्हतं, मात्र राजकीय पक्षांमुळे एवढं झालं.
X

कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. नवे कृषी कायदे रद्द करण्याती मागणी केली जात आहे. अशातच नवनीत कौर राणा यांनी "काही राजकीय नेते आणि राजकीय पक्ष शेतकऱ्यांना समोर करून, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला निशणा साधत आहेत," असा आरोप केला आहे.

त्या शेतकरी आंदोलनाबाबत म्हणाल्या, "दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरीच आहेत. मात्र, त्यांना प्रोत्साहन देणारे, त्यांच्या मागे जे आहेत, ते काही राजकीय पक्ष आहेत. एवढं मोठं आंदोलन करणं शेतकऱ्यांच्या मनात नव्हतं, मात्र राजकीय पक्षांमुळे एवढं झालं."

"जर कृषी कायद्यांवर बोलायचं झाल्यास, महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ या राज्यांमध्ये शेतकरी या कायद्याचं चांगलं स्वागत करतोय. जर महाराष्ट्रातील शेतकरी शांत बसलेत, तर त्यांना हा कायदा आवडतोय. शेतकऱ्यांना या कायद्यातून स्वातंत्र्य दिलं," असं म्हणत नवनीनत राणा यांनी नव्या कृषी कायद्याचं समर्थन देखील केलं आहे.

दरम्यान, काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली. परंतु, ही बैठकही निष्फळ ठरली असून सरकारने कृषी कायदे रद्द करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शेतकरी नेत्यांची आज केंद्र सरकारसोबत बैठक होणार नाही. यासंदर्भात आज सकाळी साडेदहा वाजता मोदी सरकाच्या कॅबिनेटची बैठक होणार आहे.

Updated : 11 Dec 2020 6:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top