Home > Political > विजेत्या संघाला 25 लिटर पेट्रोल, राष्ट्रवादी काँग्रेसचा अनोख्या पद्धतीने महागाईचा निषेध..

विजेत्या संघाला 25 लिटर पेट्रोल, राष्ट्रवादी काँग्रेसचा अनोख्या पद्धतीने महागाईचा निषेध..

विजेत्या संघाला 25 लिटर पेट्रोल तर उपवीजेत्या संघाला एक गॅस सिलेंडर बक्षीस देत राष्ट्रवादी काँग्रेस कडून महागाईचा निषेध. मुंबईत आज महागाई क्रिकेट चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हातात बॅट घेऊन सुप्रिया सुळे देखील मैदानात उतरल्या होत्या.

विजेत्या संघाला 25 लिटर पेट्रोल, राष्ट्रवादी काँग्रेसचा अनोख्या पद्धतीने महागाईचा निषेध..
X

विजेत्या संघाला 25 लिटर पेट्रोल व एक टरबूज बक्षीस देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महागाई चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित स्पर्धेत महिला व पुरुष असे दोन गट होते. वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी या महागाई चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

पेट्रोल, डीझेल, गॅस सिलेंडर यांचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. पेट्रोल आणि डीझेलच्या दरांनी शंभरी पार केली असून घरगुती गॅस सिलेंडर देखील एक हजारच्या घरात पोहोचले आहे. या सर्वामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे चांगलेच मोडले असून वाढत्या महागाईत घर कसे चालवावे हा प्रश्न गृहिणींना पडला आहे. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बंद असून कोरोना आणि महागाई यामुळे जनता त्रस्त झाली आहे. या सगळ्याचा विचार करून आज राष्ट्रवादीने अनोख्या पद्धतीने भाववाढीचा निषेध केला. ऑगस्ट क्रांती मैदानात महागाई चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विजेत्या संघाला 25 लिटर पेट्रोल व एक टरबूज तर उपवीजेत्या संघाला एक गॅस सिलेंडर व एक टरबूज बक्षीस म्हणून देण्यात आले. यावेळी उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज व क्षेत्ररक्षक यांना 5 लिटर सण फ्लॉवर तेल बक्षीस देण्यात आले.आशा प्रकारे अनेख्या पद्धतीने दक्षिण मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेची आता सर्वत्र चर्चा आहे.

आज पार पडलेल्या या स्पर्धेसाठी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन पार पडलं व त्यानंतर हातात बॅट घेऊन सुप्रिया सुळे देखील मैदानात उतरल्या होत्या.

Updated : 15 April 2022 6:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top