Home > Political > गांधी जयंतीला नथुराम गोडसेच्या समर्थनात ट्रेंड; यशोमती ठाकूर संतापल्या

गांधी जयंतीला नथुराम गोडसेच्या समर्थनात ट्रेंड; यशोमती ठाकूर संतापल्या

गांधी जयंतीला नथुराम गोडसेच्या समर्थनात ट्रेंड; यशोमती ठाकूर संतापल्या
X

आज जगभरात गांधी जयंतीनिमित्त लोक अहिंसा आणि शांती या विचारावर चालणारे महापुरुष म्हणून महात्मा गांधी यांचे स्मरण करत आहेत. असं असताना महात्मा गाधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांच्या नावाचा हॅशटॅग ट्विटर वरती Trending आहे. #नथुरामगोडसेजिंदाबाद या Treand ची मोहीमच आज ट्विटरवरती चालवली जात आहे. आज सकाळपासून हा ट्रेंड ट्विटरवर तिसऱ्या नंबर वरती आहे. यावरून राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी असे ट्रेंड चालवणाऱ्या लोकांची खाते बंद करण्याची मागणी केली आहे.

यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, " 'आजच्या दिवशी देशातील पहिला दहशतवादी नथुराम गोडसे यांच्या समर्थनार्थ ट्विटरवर चालवण्यात आलेले ट्रेंड ब्लॉक करावेत व ट्रेंड मध्ये सामील झालेल्यांचे अकाउंट बंद करावेत अशी मागणी ट्विटर कडे केली आहे, असं ठाकूर म्हणाल्या आहेत.


सकाळपासून ट्वीटरवर गांधी जयंती ट्रेंडमध्ये आहेत. #GandhiJayanti हे एक नंबरला ट्रेंड होत असून, 1 लाख 21 हजार लोकांनी हा हॅशटॅग वापरला आहे. तर #2ndOctober हे दोन नंबरवरती ट्रेंडमध्ये आहे. तर #नाथूरामगोडसेजिंदाबाद हे तीन नंबरवरती ट्रेंडमध्ये असून, 66 हजार लोकांनी हा हॅशटॅग वापरला आहे.

Updated : 2 Oct 2021 8:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top