Home > Political > नारायण राणेंना दिल्लीचा फोन, प्रीतम मुंडेंच काय ?

नारायण राणेंना दिल्लीचा फोन, प्रीतम मुंडेंच काय ?

नारायण राणेंना दिल्लीचा फोन, प्रीतम मुंडेंच काय ?
X

मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी दिल्लीत हालचाली सुरु असून, येत्या एक-दोन दिवसात नवीननवीन मंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यातून नारायण राणे, प्रीतम मुंडे, उदयनराजे भोसले आणि भारती पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र सोमवारी राणे यांना दिल्लीतील भाजप कार्यालयातून फोन आला असून, ते तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले आणि भारती पवार यांच्यासह प्रीतम मुंडेंचं काय असा प्रश्न या नेत्यांच्या कार्यकर्त्यांना पडत आहे.

आधीच पंकजा मुंडेंना राज्यातील राजकरणात भाजपकडून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होतोय. त्यात आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारमध्ये सुद्धा प्रीतम मुंडे यांना डावलण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता मुंडे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा भाजपबद्दल नाराजी दिसून येत आहे.

नारायण राणे जरी दिल्लीत गेले असले, तरीही त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली नाही. त्यामुळे दिल्लीतील नेते काय निर्णय घेतात किंवा प्रीतम मुंडे यांना संधी मिळते का? याकडे बीड मधील भाजपकार्यकर्त्यांच लक्ष ठेवून आहे.

Updated : 6 July 2021 5:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top