Home > महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार?

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार?

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार?
X

राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. कोरोनाबाधितांची संख्या ५० हजाराच्या पार झाली आहे. राज्याची ढासळती अर्थव्यवस्था, वैद्यकीय साधनांचा तुटवडा, स्थलांतरित मजुरांच्या घरवापसीची गंभीर समस्या, केंद्राकडून विशेष तरतुदींचा अभाव या सर्व समस्यांशी राज्यांचं महाविकासआघाडी सरकार लढत आहे.

हे ही वाचा...

“महाराष्ट्रात एकाच दिवशी तीन हजाराहून जास्त पेशंट सापडत आहेत. ज्या पद्धतीने कोरोनाचे पेशंट वाढत आहेत असेच पेशंट जर पुढील दहा दिवसात वाढत राहिले तर राज्य सरकारला ही परिस्थिती नियंत्रणात आणता येणार नाही. अशा परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता नाकारता येणार नाही” असं मत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी व्यक्त केलं आहे.

देशभरात कोरोनाचे पेशंट महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त आहेत. महाराष्ट्रात सध्या ५० हजाराहून जास्त कोरोनाबाधितांची संख्या आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही दिड हजारापेक्षा जास्त आहे. ४ मे ला दारूची दुकाने सुरू केल्यापासून गर्दीमुळे ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली. तसेच राज्यात गुन्हेगारीचं प्रमाणही वाढत तृप्ती देसाई यांनी म्हटलंय.

“ठाकरे सरकार कोरोना संकट हाताळू शकत नाही. या सरकारची क्षमता नाही. हे सरकार कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरलं आहे. त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी” अशी मागणी भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, आज सकाळीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यपालांची भेट घेतली होती.

Updated : 25 May 2020 1:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top