Home > Political > लेक झाली कार्याध्यक्ष, सुशिलकुमार शिंदे म्हणतात, पक्षनिष्ठेचे फळ मिळालं

लेक झाली कार्याध्यक्ष, सुशिलकुमार शिंदे म्हणतात, पक्षनिष्ठेचे फळ मिळालं

लेक झाली कार्याध्यक्ष, सुशिलकुमार शिंदे म्हणतात, पक्षनिष्ठेचे फळ मिळालं
X

थेट मोदींशी पंगा घेणारा नेता अशी ओळख असलेल्या नाना पटोले यांच्याकडे महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र देण्यात आली आहेत. तर कार्यकारीअध्यक्ष पदावर शिवाजी मोघे, बसवराज पाटील, मोहम्मह आरिफ नसीम खान, कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे आणि आमदार प्रणिती शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

प्रणिती शिंदे यांच्या कार्याध्यक्ष पदावर झालेल्या निवडीवर सुशिलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, "आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी त्यांच्या समर्थकांना खात्री होती. मात्र, त्यांना डावलण्यात आले. तरीही त्यांनी पक्षाबद्दल नाराजी व्यक्त न करता नेहमीप्रमाणे काम सुरु ठेवले. त्या पक्षनिष्ठेचे फळ पक्षाने कार्याध्यक्षपदी निवड करुन दिले. असं सुशिलकुमार शिंदे यांनी म्हटलं.

Updated : 5 Feb 2021 2:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top