Top
Home > Political > महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भेटीमुळे दोन भाऊ एकत्र येणार?

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भेटीमुळे दोन भाऊ एकत्र येणार?

बाळासाहेब ठाकरे यांच्या या पुतळ्याचे अनावरण २३ जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एका मंचावर दिसू शकतात!

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भेटीमुळे दोन भाऊ एकत्र येणार?
X

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. या निमित्त मुंबई महापालिकेकडून दक्षिण मुंबईत पोलीस मुख्यालया समोर बसवण्यात आलेल्या बाळासाहेबांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा होणार आहे.

याच सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी "कृण्णकुंज"वर गेल्या होत्या. या कार्यक्रमाचं निमंत्रण सर्वपक्षीय नेत्यांना दिलं जात आहे. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे अशा सर्व मोठ्या नेत्यांना स्वतः महापौर निमंत्रण देत आहेत. मुख्यंत्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तब्बल वर्षभरानंतर २३ जानेवारीला पुन्हा एकत्र पाहायला मिळणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एका मंचावर दिसू शकतात!

Updated : 19 Jan 2021 8:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top