Home > Political > किशोरी पेडणेकरांबद्दलचं ते वक्तव्य शेलारांना भोवलं... मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल

किशोरी पेडणेकरांबद्दलचं ते वक्तव्य शेलारांना भोवलं... मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल

किशोरी पेडणेकरांबद्दलचं ते वक्तव्य शेलारांना भोवलं... मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल
X

वरळी सिलेंडर स्फोट प्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका करताना काही दिवसांपुर्वी भाजप आमदार आशिष शेलार यांची जीभ घसरली होती. याप्रकरणी स्वतः महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलारांविरोधात मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार आता आशिष शेलारांविरोधात कलम ३५४ अन्वये मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर मुंबईत पुन्हा एकदा शिवसेना विरूध्द भाजप असा संघर्ष पेटू शकतो. याप्रकरणात जामीन मिळावा यासाठी शेलार यांना थेट कोर्टातच जावं लागणार आहे.

काही दिवसांपूर्वी भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता पेडणेकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजप नेते आशिष शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने भाजपला हा दुसरा धक्का दिल्याचं बोललं जात आहे. आशिष शेलार यांना पोलिसांनी अटक केल्यास मुंबई महापालिका निवडणुकीच्याआधीच मुंबईत भाजप-शिवसेना यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजपकडून शेलार यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं म्हटलं जातं आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेल्या टीकेप्रकरणी शिवसेनेकडून भाजपला वारंवार प्रत्युत्तर देण्यात आलं. आशिष शेलार यांना पोलिसांनी अटक केली तर भाजप-शिवसेना यांच्यातील संघर्षाला पुन्हा एकदा ठिणगी पडणार आहे.

महिलेविषयी कुणीही आक्षेपार्ह वक्तव्य करु नये. तशा प्रकारची हिंमत करु नये आणि धजावू सुद्धा नये अशा आक्रमक पद्धतीने मत मांडत किशोरी पेडणेकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. दरम्यान कोणत्याही परिस्थितीत शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा, या मागणीवर पेडणेकर ठाम होत्या. अखेर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ज्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो लैंगिक छळ या दोन शब्दांमध्ये फिरणारा आहे. याचबरोबर कलम 509 या अंतर्गत विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कलम 354 हे कोर्ट बेलेबल आहे. तसेच मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अत्यंत वेगाने हालचाली घडत आहेत.

Updated : 9 Dec 2021 4:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top