Home > Covid19 : किेशोरी पेडणेकरांनी घेतली परिचारिकांची भेट, सांगितल्या 'या' गोष्टी

Covid19 : किेशोरी पेडणेकरांनी घेतली परिचारिकांची भेट, सांगितल्या 'या' गोष्टी

Covid19 : किेशोरी पेडणेकरांनी घेतली परिचारिकांची भेट, सांगितल्या या गोष्टी
X

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pedanekar) यांनी आज नायर रुग्णालयास भेट दिली या भेटीदरम्यान कोरोना संकटाच्य़ा काळात काम करणाऱ्या परिचारिका आणि शिक्षण घेत असलेल्या तरुणींच कौतुक केलं. त्यांचा कामाचा गौरव करण्यासाठी मुंबई महापलिकेकडून पुरस्कर जाहीर करु असं आश्वसनही त्यांनी यावेळी दिलं. नागरिकांची जबाबदारी आम्ही घेतली आहे. त्यांनी खबरदारी घेऊन घरात बसलं पाहीजे. असं संदेश त्यांनी जनतेलाही दिला.

हे ही वाचा...

परिचारिका म्हणून शिक्षण घेत असलेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील मुली कोरोनाच्या संकटकाळात स्वत: पुढे येऊन काम करत आहेत. त्यांच्या आयुष्य़ातील हे पहिलंच संकट खुप मोठं आहे. अशा या कठीण काळात काम करणाऱ्या मुलींना भविष्यात कोणत्याही संकटाला तोंड देणं सहज शक्य आहे असं कौतुक य़ावेळी किशोरी पेडणेकर यांनी केलं.

महापौर स्वत: परिचारिका म्हणून केईएम रुग्णालयात कार्य़रत होत्या त्यामुळे त्यांना कोरोनाच्या लढाईत परिचारिकांच्या कामाची आणि मेहनतीची जाणीव आहे. संकाटकाळात जीव धोक्यात घालून लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करणाऱ्या य़ा परिचारकांचं मनोबल वाढवणं ही महापौर आणि परिचारिका म्हणून माझी जबाबदारी आहे अशी भावना पेडणेकर यांनी व्यक्त केली.

https://youtu.be/ufWOGfCK4Cs

Updated : 27 April 2020 10:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top