Home > Political > "संविधान व लोकशाही प्रती सजग नागरिक घडविण्यासाठी संविधान स्थंभ आवश्यक"

"संविधान व लोकशाही प्रती सजग नागरिक घडविण्यासाठी संविधान स्थंभ आवश्यक"

राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

संविधान व लोकशाही प्रती सजग नागरिक घडविण्यासाठी संविधान स्थंभ आवश्यक
X

राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. संविधान व लोकशाही व्यवस्थेप्रती सजग नागरिक घडविण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारण्याचं पाऊल आवश्यक आहे, असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

संविधान स्तंभ उभारण्याची मागणी करणारे पत्र सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबूक पेजवर पोस्ट केलं असून यात त्यांनी "भारताच्या संविधानाप्रती जागरुकता निर्माण व्हावी,भावी पिढ्यांना प्रेरणा मिळावी या भावनेतून बारामती लोकसभा मतदारसंघातील नगरपालिका, नगरपरिषदा आणि महापालिकेच्या क्षेत्रात संविधान स्तंभ उभारले आहेत.हा उपक्रम अतिशय प्रेरणादायी असून तो राज्यभरात राबविण्याची आवश्यकता आहे."


"यासाठी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आपणास नम्र विनंती आहे की,कृपया महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासकीय अथवा निमशासकीय जागेवर संविधान स्तंभ उभारण्याबाबत आपण सकारात्मक विचार करावा.संविधान व लोकशाही व्यवस्थेप्रती सजग नागरिक घडविण्यासाठी हे आवश्यक आहे. आपण यावर नक्की सकारात्मक निर्णय घ्याल हा विश्वास आहे." असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबूक पोस्ट मध्ये म्हटलं आहे.Updated : 26 Jan 2021 9:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top