Home > Political > सुप्रिया सुळेंची एक भेट आणि तिने कमावलेला आत्मविश्वास..

सुप्रिया सुळेंची एक भेट आणि तिने कमावलेला आत्मविश्वास..

सुप्रिया सुळेंची एक भेट आणि तिने कमावलेला आत्मविश्वास..
X

लोकप्रतिनिधी कितीही मोठे झाले तरी त्यांची ओढ ही मतदारसंघातच असते. मतदार संघात फिरणं, लोकांशी बोलणं, त्यांच्या समस्या जाणून घेणे हे लोकप्रतिनिधी वारंवार करत असतात. अशाच प्रकारे काल राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे त्यांच्या मतदारसंघात फिरत होत्या आणि फिरत असताना त्यांना कल्याणी धनाजी थोरात ही मुलगी भेटली. आज ही मुलगी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे लहान असताना सुद्धा ही मुलगी सुप्रिया सुळेंना भेटली होती. लहानपणीच्या भेटीनंतर आता कॉलेजमध्ये असताना ती तरुणी पुन्हा सुप्रिया सुळे यांना भेटली. पुन्हा त्यांना भेटताना या मुलीने एक पत्र लिहिले आहे या पत्रात तिने नक्की काय म्हंटल आहे पाहुयात..

खासदार सुप्रिया सुळे काल त्यांच्या मतदारसंघात दौरा करत होत्या. या दौऱ्यादरम्यान त्यांना एक मुलगी भेटली. या मुलीने सुप्रिया सुळे यांना एक पत्र दिले या पत्रात ती मुलगी म्हणते, ''मी बारा वर्षाची असताना पहिल्यांदा भाषण केलं होतं. तेव्हापासून माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. एक राजकारणी म्हणून ताई नेहमीच आदर्श आहेत. पण जेव्हा मी एक मुलगी म्हणून त्यांच्याकडे पाहते तेव्हा मला खूप आत्मविश्वास येतो, प्रेरणा मिळते. ज्या ज्या वेळी सुप्रिया सुळे आमच्या गावी येतात त्यावेळी त्यांच्याकडून मला स्फूर्ती भेटते.''

सुप्रिया सुळे यांना च्या मुलीने पत्र लिहिले आहे ही मुलगी सध्या बीएससी एग्रीकल्चरचे शिक्षण घेत आहे. अगदी लहानपणापासून कॉलेज जीवनापर्यंत घडत असताना ती सुप्रिया सुळे यांना रोल मॉडेल म्हणून पाहते. खरंतर फार कमी राजकारणी आहेत ज्यांना तरुण मुलं-मुली रोलमॉडेल म्हणून पाहतात. सुप्रिया सुळे यांच्या विषयी या मुलीने लिहिलेल्या पत्रानंतर सुप्रिया सुळे यांनी तिचे हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. आणि या कल्याणी सारख्या मुलींचा आत्मविश्वास माझ्यासाठी प्रेरक आणि ऊर्जा देणारा आहे. म्हणूनच मतदारसंघात काम करताना उत्साह वाटतो. मी सातत्याने संसदेत लोकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करते, याचे कारण देखील जनतेचे हे अलोट प्रेम असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटले..

सुप्रिया सुळे यांनी फेसबुक वर या मुलीचे पत्र शेअर करत असताना दोन फोटो सुद्धा शेअर केले आहेत. त्यामध्ये पहिला फोटो हा ती मुलगी बारा वर्षाची असताना जेव्हा सुप्रिया सुळे यांना भेटली होती तेव्हाच आहे आणि दुसरा फोटो कालच्या भेटीचा आहे. हे दोन फोटो जर आपण पाहिले तर एक पिढी कशी घडते हे आपल्याला समजतं. या जडणघडणीत एखाद्याची एक छोटी भेट किंवा शाब्बासकीची थाप सुद्धा त्यांचं प्रेरणास्थान होऊ शकते आणि त्यांच्या आयुष्याला एक वळण देऊ शकतं. ही मुलगी लहान असताना तिने सुप्रिया सुळे यांना पाहिलं होतं, भाषण केलं होतं. यावेळी तिच्या पाठीवर पडलेली कौतुकाची थाप तिला प्रेरणा देणारी ठरली आणि हीच प्रेरणा घेऊन तिने इथपर्यंत वाटचाल केली. म्हणजे एक भेट आणि एक कौतुकाची थाप अनेकांना जीवनाची दिशा कशा प्रकारे देऊ शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे..

Updated : 25 May 2023 6:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top