Home > Political > ममता बॅनर्जी यांची 'शताब्दी' भाजपच्या ट्रॅकवर?

ममता बॅनर्जी यांची 'शताब्दी' भाजपच्या ट्रॅकवर?

ममता बॅनर्जी यांची शताब्दी भाजपच्या ट्रॅकवर?
X

पश्चिम बंगालमधील निवडणूक जससशी जवळ येऊ लागली आहे तसतसे तेथील राजकीय वातावरणही तापू लागले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी पुढील महिन्यात तृणमूल काँग्रेसचे ५० आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केल्यानंतर तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार शताब्दी रॉय यांच्या पोस्ट फेसबूकमुळे ममता बॅनर्जी यांच्या टेन्शन अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

अभिनेत्री व खासदार शताब्दी रॉय यांनी "जर मी निर्णय घेतला तर तुम्हाला १६ जानेवारीला दुपारी २ वाजता माहिती देईन," अशी पोस्ट त्यांच्या फेसबुक फॅन पेजवर करण्यात आली आहे. शताब्दी रॉय २००९ पासून बिरभूमचं प्रतिनिधित्व करत आहेत. ही पोस्ट शताब्दी रॉय यांच्या फॅन पेजवर असल्याने यामध्ये कितपत तथ्य आहे याबाबत शंका व्यक्त होत आहे.

फेसबुक पोस्टवर व्यक्त होत रॉय यांनी पक्षातील काही नेते त्यांना कमी लेखू लागले असल्याचा आरोप केला आहे. यामुळे राजकीय भविष्यावर त्या मोठा निर्णय घेण्याची शक्यता असून यासाठी त्यांनी शनिवारी, 16 जानेवारी दुपारी 2 वाजताची वेळ दिली आहे.

Updated : 15 Jan 2021 4:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top