Home > Political > सुनेच्या आरोपानंतर खासदार रामदास तडस यांचे स्पष्टीकरण...

सुनेच्या आरोपानंतर खासदार रामदास तडस यांचे स्पष्टीकरण...

सुनेच्या आरोपानंतर खासदार रामदास तडस यांचे स्पष्टीकरण...
X

वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने तडस कुटूंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचे म्हणत आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. सोबतच त्यांनी एक व्हिडीओ शूट करुन राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकर यांना मदतीची मागणी केली. या व्हिडीओत तडस यांच्या सुन रडत असल्याचे दिसत आहे. तडस कुटुंब आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोप त्यांनी केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या सगळ्या प्रकारावर आता रामदास तडस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले की, माझ्या मुलाला संपत्तीतून बेदखल केले होते. त्यानंतर तो वर्धा इथे घर घेऊन राहत होता. पूजा नावाच्या मुली सोबत ऑक्टोबरमध्ये त्याने लग्न केले. या लग्नाची कसलीही आम्हाला कल्पना नव्हती. लग्नाच्या वेळी मुलीचे जावई आणि बहिण हे दोघेच त्या ठिकाणी होते. त्यानंतर ते दोघे फ्लॅट वरती राहत होते. ते दोघे माझ्याकडे आले व त्यांनी मला लग्न झाल्याचे सांगितले. तुम्हाला घरात राहायचे असेल तर तुम्ही या असेही मी त्यांना सांगितले होते. पण ते आले नाहीत. ते आमच्यासोबत राहत नाहीत. त्यामुळे हे सर्व फक्त राजकारणासाठी चालू आहे. आमचे राजकारण कसे संपवायचे म्हणून विरोधक प्रयत्न करत असल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

Updated : 8 Sep 2021 1:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top