खासदार रजनीताई पाटील यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट
Max Woman | 20 Oct 2021 3:18 AM GMT
X
X
महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवड झाल्यानंतर प्रथमच खासदार रजनीताई पाटील यांनी दिल्ली येथे सोनिया गांधींची भेट घेतली. त्यांनी या वेळी सोनिया गांधींचे आभार मानून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात बिहारी नागरिकांचा मृत्यू झाल्याने जम्मू-काश्मीरमधील सद्य:स्थितीची माहिती तिथल्या प्रभारी या नात्याने दिली.
तसेच मराठवाड्यात झालेली अतिवृष्टी व त्यामुळे झालेले नुकसान याचीही खासदार पाटील यांनी माहिती दिली. अनेक विषयांवर त्यांनी या वेळी चर्चा केली. खासदारपदाची जबाबदारी दिल्याने त्यांनी आभार व्यक्त केले. खासदार रजनीताई पाटील यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
Updated : 2021-10-20T08:49:11+05:30
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire