Home > Political > I'm sorry to say मीडिया म्हणून मला तुमचा आवाज सक्षम वाटत नाही.. - खा. प्रीतम मुंडे

I'm sorry to say मीडिया म्हणून मला तुमचा आवाज सक्षम वाटत नाही.. - खा. प्रीतम मुंडे

Im sorry to say मीडिया म्हणून मला तुमचा आवाज सक्षम वाटत नाही.. -  खा. प्रीतम मुंडे
X

"ऑन द रेकॉर्ड किंवा ऑफ द रेकॉर्ड" जसं तुम्हाला वाजवायचंय तसं तुम्ही वाजवा. जर खासदार म्हणून माझा आवाज तुम्हाला सक्षम वाटत नसेल तर मला मीडिया म्हणून तुमचा आवाज देखील सक्षम वाटत नाही असं म्हणत पत्रकारांच्या प्रश्नांना बगल देत खासदार मुंडे भडकल्या.

बीड जिल्ह्यात देवस्थानच्या जमिनी लाटण्याचे प्रकार घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर नामलगाव येथील गणपती मंदिराच्या 26 एकर जमीन लटणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला नाही. एकीकडं आष्टीमध्ये गुन्हा दाखल होतो, मात्र बीडमध्ये होत नाही. यावर तुम्ही आवाज उठवणार का ? हा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, यावर प्रीतम मुंडे म्हणाल्या, की 'जिथे जिथे अन्याय होताना दिसतो, तिथं तिथं आवाज उचलणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही निश्चित करू'. असं म्हणत खासदार मुंडे यांनी प्रश्नाला बगल दिली.

मात्र यावरही पुन्हा प्रश्न केला असता, खासदार प्रीतम मुंडे भडकून म्हणाल्या, की ऑन द रेकॉर्ड की ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला जसं वाजवायचे तसं वाजवा माझं काही म्हणणं नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की जेव्हा समाजामध्ये सर्व काही आलबेल असावं ही अपेक्षा असते. पण हे करत असताना जसं खासदार म्हणून माझी काही जबाबदारी आहे तसेच पत्रकार म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे जर विरोधी पक्ष म्हणून खासदारांचा आवाज तुम्हाला सक्षम वाटत नाही तर I'm sorry to say मीडिया म्हणून मलाही तुमचा आवाज सक्षम वाटत नाही..असं म्हणत खासदार प्रीतम मुंडेंनी पत्रकारांचा समाचार घेतला.

Updated : 23 Nov 2021 12:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top