Latest News
Home > Political > सुप्रिया सुळे अचानक पोचल्या ढमढेरेंच्या कार्यालयात

सुप्रिया सुळे अचानक पोचल्या ढमढेरेंच्या कार्यालयात

सुप्रिया सुळे अचानक पोचल्या ढमढेरेंच्या कार्यालयात
X

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराचे उपाध्यक्ष सुशांत ढमढेरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी सदिच्छा भेट दिली. अशी माहिती सुशांत ढमढेरे यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टद्वारे दिली आहे.


राष्ट्रवादीच्या महिला नेत्या तसेच लोकसभा खासदार सुप्रिया सुळे या त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कार्यकर्त्यांच्या कार्यालयांना अचानक भेटी देत असतात. अशीच सदिच्छा भेट त्यांनी पुण्यातील पदाधिकारी सुशांत ढमढेरे यांच्या कार्यालयाला दिली.


सुशांत ढमढेरे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराचे उपाध्यक्ष आहेत. सुप्रिया सुळे यांच्यासमोर त्यांनी स्वतःच्या कार्याचा अहवालच सादर केला. याशिवाय त्यांनी छापलेल्या नववर्षाच्या दिनदर्शिकांचे प्रकाशन सुप्रिया सुळेंच्या हस्ते केले. या भेटीचे काही फोटो सुशांत ढमढेरे यांनी फेसबूकवर पोस्ट केले आहेत आणि सुप्रिया सुळेंच्या या भेटीची माहिती दिली.

Updated : 2022-01-19T09:32:36+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top