Home > Political > "याद राखा, गाठ मनसेशी आहे"; शालिनी ठाकरे वड्डेटीवारांवर संतापल्या

"याद राखा, गाठ मनसेशी आहे"; शालिनी ठाकरे वड्डेटीवारांवर संतापल्या

याद राखा, गाठ मनसेशी आहे; शालिनी ठाकरे वड्डेटीवारांवर संतापल्या
X

आधीच राज्यातील मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा निघत नसताना त्यात आणखी एका नवीन आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. १९६७ पूर्वी जी कुटुंब परप्रांतातून महाराष्ट्रात आली आहेत त्यांना राज्यात आरक्षण देण्याविषयी आम्ही सकारात्मक असल्याचे विधान ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेले विजय वड्डेटीवार यांनी केलं आहे. तर यावर मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्विट करुन जोरदार टीका केली आहे.

शालिनी ठाकरे यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, "भैय्याला दिली ओसरी भैय्या हातपाय पसरी! आजपर्यंत मुंबईने सगळ्यांना सामावून घेतले आहे म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की इथल्या भूमीपुत्रांच्या अधिकारांवर आणि हक्कांवर गदा आणाल.हिम्मतच कशी होते महाराष्ट्र मध्ये उत्तर भारतीयांची आरक्षण मागण्याची.. याद राखा..गाठ मनसेशी आहे." असा इशारा शालिनी ठाकरे यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते वड्डेटीवार?

'परप्रांतातून राज्यात स्थायिक झालेले अनेक ओबीसी कुटुंब आहेत. परप्रांतीय ओबीसी समाजाने माझी भेट घेऊन राज्यात आरक्षण देण्याची मागणी केली आहे. १९६७ पूर्वी जी कुटुंब परप्रांतातून महाराष्ट्रात आली आहेत त्यांना राज्यात आरक्षण देण्याविषयी आम्ही सकारात्मक आहोत. मागासवर्ग आयोगाला याबाबत शिफारस करू त्यांचा प्रस्ताव आला की केंद्र सरकारला शिफारस केली जाईल.' असं विजय वड्डेटीवार म्हणाले होते.

Updated : 4 Sep 2021 7:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top