Home > Political > फुकटचे सल्ले देण्यापेक्षा संजय राऊत यांचा मुस्लिमविरोधी लेख वाचा, शालिनी ठाकरेंनी सुनावलं

फुकटचे सल्ले देण्यापेक्षा संजय राऊत यांचा मुस्लिमविरोधी लेख वाचा, शालिनी ठाकरेंनी सुनावलं

फुकटचे सल्ले देण्यापेक्षा संजय राऊत यांचा मुस्लिमविरोधी लेख वाचा, शालिनी ठाकरेंनी सुनावलं
X

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ मे च्या सभेत राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर मनसे विरूध्द शिवसेना असा नवा संघर्ष आता पेटू लागला आहे. शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना उत्तर भारतीयांची माफी मागण्यासाठी आदित्य ठाकरेंना सोबत घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. त्यावर आता मनसेच्या शालिनी ठाकरेंनी दिपाली सय्यद यांना फुकटचे सल्ले न देता संजय राऊतांचा अग्रलेख वाचण्याचा सल्ला दिला आहे.

"राजसाहेबांना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फुकटचे सल्ले देण्यापेक्षा 'मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या' असा अग्रलेख लिहिणाऱ्या 'सामना'वीरांचा अग्रलेख वाचा. मग तुमच्यातील 'सय्यद' अचानक 'बंड' करेल किंबहुना त्याने तसं करायलाच हवं!", असं म्हणत शालिनी ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या सामनातील अग्रलेखावर स्क्रोल डॉट इन या वेब पोर्टलने केलेल्या बातमीची लिंक देत दिपाली सय्यद यांना फुकटचे सल्ले न देण्याचा सल्ला देत संजय राऊत यांचा मुस्लिम विरोधी अग्रलेख वाचण्याचा सल्ला दिला आहे.

काय म्हणाल्या होत्या दिपाली सय्यद?

"ज्यांचे राजकारण दोन तालुक्यांचे ते शिवसेनेला नोटा चे राजकारण काय शिकवणार, जर भिती वाटत असेल तर अयोध्येत शिवसेनेचा धाक आजही कायम आहे. आदित्य साहेबांना विनंती करून सोबत येऊ शकता,माफी मागण्याची गरज लागणार नाही. जय श्रीराम.", असं म्हणत दिपाली सय्यद यांनी थेट राज ठाकरेंना सल्ला दिला होता.

Updated : 18 May 2022 12:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top