Home > Political > श्वेता महालेंनी घेतली मोदींची भेट; फोटोवर नेटकर्यांच्या भन्नाट कॉमेंट्स

श्वेता महालेंनी घेतली मोदींची भेट; फोटोवर नेटकर्यांच्या भन्नाट कॉमेंट्स

श्वेता महालेंनी घेतली मोदींची भेट;  फोटोवर नेटकर्यांच्या भन्नाट कॉमेंट्स
X

आज राजधानी दिल्लीत महाराष्ट्र विधीमंडळाच्यावतीने नवनिर्वाचित आमदारांसाठी लोकसभा सचिवालय आणि प्राईड संस्थेच्या संयुक्त विद्यमाने संसदीय प्रशिक्षण कृती कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. त्यामुळं सर्व पक्षीय आमदार दिल्ली येथे दाखल झाले आहेत.

या दरम्यान आमदार श्वेता महाले यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यानचा फोटो त्यांनी समाज माध्यमांवर शेअर केला आहे. श्वेता महाले यांनी हा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, "विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते, युगपुरुष, आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांची दिल्ली येथे भेट घेऊन महाराष्ट्राच्या प्राचीन संस्कृतीची विशेष ओळख असलेल्या पैठणीचा शेला त्यांना भेट दिला."

असं म्हणत त्यांनी त्यांचा व नरेंद्र मोदी यांचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. आमदार श्वेता महाले यांनी हा फोटो शेअर केल्यानंतर त्यावरती अनेक कमेंट आणि लाईकचा येत आहेत. अनेकांनी श्वेता महाले यांना भावी खासदार म्हटला आहे तर अनेकांनी कमेंटमध्ये नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे. अशा अनेक भन्नाट कमेंट त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळतात त्यामुळे एका Twitter वापरकर्त्याने तुम्ही खूपच सुंदर दिसत आहे या साडीत असं म्हणत महाले यांचं कौतुक केलं आहे.

आता त्यांच्या फोटो वरती लोकांनी आणखीन काय कॉमेंट्स आल्या आहेत ते देखील आपण पाहूयात..

ज्ञानेश्वर शिंदे हे ट्विटर युजर श्वेता महाले यांच्या फोटो वर कमेंट करत म्हणतात ''जागतिक महान नेते श्री नरेंद्र मोदी जी…''

तर एका मी शिवसैनिक पुरोगामी व सेक्युलर अशा नावाने असलेल्या ट्विटर वापरकर्त्याने म्हटलं आहे ''नशीब भक्तीमध्ये वाहून पैठणी गिफ्ट केली नाही..?''

राहुल नवले म्हणतात ''मै तो बोलता हुं मोदिजी पूरूष ही नही वो तो महापुरूष है..''

Updated : 2022-04-05T15:05:00+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top