Home > Political > "काय डोंगार, काय हाटील" वाले आमदार शहाजी पाटील नेमकं आहेत तरी कोण?

"काय डोंगार, काय हाटील" वाले आमदार शहाजी पाटील नेमकं आहेत तरी कोण?

काय डोंगार, काय हाटील वाले आमदार शहाजी पाटील नेमकं आहेत तरी कोण?
X

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार देखील धोक्यात आले आहे. 40 पेक्षा अधिक आमदारांचा एकनाथ शिंदे यांना पाठींबा असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ आता खासदारही बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. इतकी मोठी राजकीय घडामोड घडत असताना महाराष्ट्रत चर्चा मात्र एकाच आमदारांची आहे. ते आमदार म्हणजे शहाजी बापू पाटील. आता काल पासून तुमच्या मोबाइलवर एक तर " काय तो डोंगुर काय ते हाटील" असं मिम्स आलं असेल. तर झालं असं आहे की, एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या फोन कॉलची कथीत क्लिप व्हायरल झाली आहे. त्यावरून मीम्सचा समाजमाध्यमांवर धुमाकूळ उडाला आहे. हा गावरान रांगडा आवाज ऐकून शराहतील अनेकांना त्याची भुरळ पडली आहे. आपण जर पाहिलं तर विधानसभेत असे अनेक नेते आहेत हे त्यांच्या अत्यंत रांगड्या भाषेमुळे संपूर्ण सभागृह दणाणून सोडतात. आता शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांचं सुद्धा भाषण तुम्ही ऐकले असेल त्यांच्या सुद्धा बोलण्यात एक रांगडेपणा आहे. असे अनेक नेते आपल्याला पाहायला मिळतात. पण आता जे शहाजी बापू यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे त्याची समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा आहे. ही ऑडिओ क्लिप ऐकल्यावर तुम्हाला शहाजी बापू कोण आहेत असा प्रश्न नक्की पडला असेल.

शहाजीबापू पाटील आहेत तरी कोण ?

काँग्रेस मधून झाली होती राजकीय प्रवासाला सुरवात..

शहाजीबापू हे सुरवातीला कंग्रेसमध्ये होते. त्यांचा लोकसभेसाठी एकदा नाही दोनदा नाही तर चारदा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांनी दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या विरोधात निवडणूक देखील लढवली देखील लढवली होती. खतरत शहाजीबापू यांचा राजकीय प्रवास पहिला तर ते अगदी विद्यार्थी दाशेपासून राजकारणात सक्रिय आहेत. इथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरवात आहे.



एकदा नाही तर चारदा पराभव स्वीकारावा लागला होता..

सुरवातीला काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली ती थेट गणपतराव देशमुख यांच्या विरोधात या निवडणुकीत त्यांचा प्रभाव झाला. त्यानंतर त्यानंतर शहाजी पाटील यांना पुन्हा एकदा विधानसभेसाठी संधी मिळाली आणी या निवडणुकीत त्यांनी गणपतराव देशमुख यांचा पराभव केला. त्यानंतर एकदा नाही चारदा त्यांचा पराभव झाला.



शिवसेनेत प्रवेश..

आता इतके पराभव पहिल्या नंतर मग काय त्यांनी थेट पक्षच बदलला आणि शिवसेनेत प्रवेश केला. मग त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव करत शहाजीबापू विधानभवनात पोहोचले. खरतर त्यांना या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवायची होती. पण ही जागा शिवसेनेला गेली. बाकी शहाजीबापू यांचे वक्तृत्व, बोलण्याची एक शैली ही भन्नाटच आहे. ते भाषण करू लागले की त्यांच्या त्या गावरान भाषेने अनेकांना भुरळ पडतात.




"काय झाडी, काय डोगार , काय हाटील" यावरून अनेक मिम्स सुद्धा बनले आहे. ते मिम्स सुद्धा काय आहेत पाहुयात..

दादा कोंडके या ट्वीटर अकाऊंटवरून शहाजी बापू पाटील यांच्या वक्तव्यानंतर मीम्स ट्वीट केलं आहे.

Updated : 26 Jun 2022 5:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top