Home > Political > लोकांना पिण्यासाठी गढूळ पाणी पाजणाऱ्या अधिकाऱ्यांना यशोमती ठाकूर यांनी झाप झाप झापलं!

लोकांना पिण्यासाठी गढूळ पाणी पाजणाऱ्या अधिकाऱ्यांना यशोमती ठाकूर यांनी झाप झाप झापलं!

लोकांना पिण्यासाठी गढूळ पाणी पाजणाऱ्या अधिकाऱ्यांना यशोमती ठाकूर यांनी झाप झाप झापलं!
X

अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असून पिण्याचे पाणी गढूळ येत असल्याने स्थानिक नागरिकांनी थेट पालकमंत्र्यांकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी तिथे भेट देऊन पाहणी केली व नगरपंचायतीच्या कामांचा स्वतंत्र बैठकीद्वारे आढावा घेतला. यावेळी कामचुकार करणाऱ्या अधिकाऱ्यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेत, झाप-झापल्याच पाहायला मिळाले. तसेच विकास कामांच्या पैश्यांचा चुकीचा वापर होत असल्याचे सुद्धा अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देत, यावर उत्तर मागितले.

यावेळी बोलताना ठाकूर यांनी, तिवसा शहरात सफाईकामांत नियमितता नाही. डेंग्यूचे रूग्ण वाढत असल्याच्या सतत तक्रारी येत आहेत. स्वच्छता व आरोग्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या जीवाशी खेळू नका. बेजबाबदारपणे वागल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा नगरपंचायत प्रशासनाला दिला.

तसेच, पाणीपुरवठ्याबाबतही मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. पाणी गढूळ असल्याच्या तक्रारी आहेत. पुरवठ्याच्या कामात तत्काळ सुधारणा करावी. शहरातील सफाईकामे तत्काळ सुरळीत करावी. सर्व ठिकाणी स्प्रेईंग, फॉगिंगमध्ये सातत्य ठेवावे. कुठल्याही कामात हयगय चालणार नाही. येत्या आठवडाभरात परिस्थितीत सुधारणा दिसली पाहिजे. आपण स्वत: पुन्हा येऊन याबाबत आढावा घेऊ, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

72 लाखांच कंपाउंड वॉल आणि...

नगरपंचायतीच्या परिसरासाठी करण्यात आलेल्या कंपाउंड वॉल साठी 72 लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे जर कंपाउंड वॉल साठी 72 लाखांचा खर्च केला जात असेल आणि लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसेल तर असे खर्च कशाला करता असे म्हणत पालकमंत्री यशोमती ठाकूर चांगल्याच संतापलेल्या पाहायला मिळाले. बिनकामाचे खर्च करण्यापेक्षा लोकांच्या हितासाठी शासकीय निधीचा वापर करा असेही यावेळी ठाकूर म्हणाल्या.

Updated : 1 Aug 2021 6:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top