Home > Political > "दिघे साहेबांच्या वाघाला खरं हिंदुत्व समजलं" भाजपा आमदाचे ट्विट..

"दिघे साहेबांच्या वाघाला खरं हिंदुत्व समजलं" भाजपा आमदाचे ट्विट..

दिघे साहेबांच्या वाघाला खरं हिंदुत्व समजलं भाजपा आमदाचे ट्विट..
X

शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकानाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्ताने खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्रीपासून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे 22 आमदार नॉटरिचेबल असल्याचे वृत्त येत आहे त्यामुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे. एकनाथ शिंदे भाजपच्या संपर्कात असल्याचे सुद्धा म्हंटले जात आहे या सगळ्यावर भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी ट्विट करत दिघे साहेबांच्या वाघाला खरं दिंदुत्व समजलं अस ट्विट केलं आहे.

एकनाथ शिंदे हे सुरतमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याचे म्हंटले जात आहे त्या ठिकाणी गुजरात पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त लावला आहे. दरम्यान भाजपच्या गुजरातमधील काही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर आता मेघना बोर्डीकर यांनी ट्विट करतं म्हंटल आहे की, साहेबांच्या वाघाला खरं दिंदुत्व समजलं अस ट्विट करत त्यांनी एकनाथ शिंदे यांचे धर्मवीर सिनेमातील व देवेन्द्र फडणवीस यांच्यासोबतचे फोटो असलेला एक वहिडिओ देखील शेअर केला आहे.

Updated : 2022-06-21T15:24:41+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top