Home > Political > ..शिंदेंची पदावरून हकालपट्टी ; एकनाथ शिंदे समर्थक आक्रमक

..शिंदेंची पदावरून हकालपट्टी ; एकनाथ शिंदे समर्थक आक्रमक

..शिंदेंची पदावरून हकालपट्टी ; एकनाथ शिंदे समर्थक आक्रमक
X

आज शिवसेना जिल्हा संघटक पदावरून माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची हकालपट्टी केल्यानंतर ठाण्यातील महिला शिवसेना पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शिवसेनेतून आमची कोणी हकालपट्टी करु शकत नाही, आम्ही शिवसैनिकच आहोत, आमचं पद अशा प्रकारे कोणी काढून घेऊ शकत नाही. बातम्यानमधून दाखवलेलं लेटर अजुन तरी आमच्या पर्यंत पोचलेल नाही. हकालपट्टी हा शब्द हास्यस्पद, तुम्ही अशा प्रकारे सर्वांचीच हकालपट्टी करणार असाल तर शिवसेना शाखेला टाळा लावायला तरी कोणाला ठेवणार आहात का? मीनाक्षी शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल, तर आम्ही आमच्या शिंदे साहेबांमुळे आहोत आणि पुढे ही राहु, शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या टेंभी नाका येथील आनंद आश्रम येथे त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हकालपट्टी करण्यापेक्षा एकच नास्का आंबा आहे तोच काढा.जर तुम्ही सगळ्या शिवसैनिकांची हकालपट्टी करणार असाल तर, शाखेला निदान २ तरी लोक टाळे मारायले ठेवा.


माजी महापौर, मीनाक्षी शिंदे

Updated : 28 Jun 2022 3:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top