Home > Political > गांधी कुटुंबाने लस घेतल्याच वेळीच सांगितलं नसल्याने एवढे मृत्यू; केंद्रीय महिला मंत्र्याचा अजब दावा

गांधी कुटुंबाने लस घेतल्याच वेळीच सांगितलं नसल्याने एवढे मृत्यू; केंद्रीय महिला मंत्र्याचा अजब दावा

गांधी कुटुंबाने लस घेतल्याच वेळीच सांगितलं नसल्याने एवढे मृत्यू; केंद्रीय महिला मंत्र्याचा अजब दावा
X

केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी कोरोना काळातील मृत्यूसाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना जबाबदार धरले आहे. गांधी कुटुंबातील किती लोकांना लसी दिली गेली आहे, हे लोकांना कळले असते तर गोंधळ निर्माण झाला नसता आणि इतका मृत्यू झाला नसता असा अजब दावा लेखी यांनी केला आहे. मीनाक्षी लेखी यांच्या या वक्तव्यावर नंतर सोशल मिडियावर त्यांच्यावर टीका होताना पाहायला मिळत आहे.

मीनाक्षी लेखी यांनी एका खाजगी वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हंटल आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात'मधून सत्य सांगतात. मात्र राहुल गांधी सारखे नेते गरजेच्या वेळी देशाच्या सेवेसाठी पुढे आले असते तर, लसीकरणाचे असे हाल झाले नसते. या देशात त्यांच्या पूर्वजांनच्या काळात लस येण्यासाठी 30-30 वर्षे लागत होते. मात्र यावेळी जगात लस येताच तत्काळ भारतात सुद्धा लस आली,असल्याचा दावा लेखी यांनी केला.

तर पुढे बोलताना त्या म्हणाल्यात की, राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबातील कोण-कोणत्या व्यक्तीला लस देण्यात आली याची माहिती वेळेवर लोकांना दिली असती तर, एवढे मृत्यू झाले नसते. त्यामुळे कोरोना काळातील मृत्यूसाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी जवाबदार असल्याचा अजब दावा मीनाक्षी लेखी यांनी केला आहे.

Updated : 26 July 2021 5:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top