Home > Political > "बिनबूडाचे आरोप करणं बंद करा", महापौर किशोरी पेडणेकरांचं अमित साटमांना प्रत्युत्तर

"बिनबूडाचे आरोप करणं बंद करा", महापौर किशोरी पेडणेकरांचं अमित साटमांना प्रत्युत्तर

बिनबूडाचे आरोप करणं बंद करा, महापौर किशोरी पेडणेकरांचं अमित साटमांना प्रत्युत्तर
X

भाजप आमदार अमित साटम यांनी शिवसेनेवर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग पुनर्रचना करण्यावरून टीका केली होती. त्यांनी शिवसेना आपल्या मनाप्रमाणे प्रभाग रचना करून घेत आहे असा आरोप केला होता. त्यांच्या या टीकेवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. किशोरी पेडणेकर यांनी अमित साटम यांना उत्तर देताना, "बिनबुडाचे आरोप करणं बंद करा असा सल्ला दिला. शिवाय 2017 ला ज्यावेळेस मनाप्रमाणे प्रभाग रचना केली गेली होती विरोधी पक्ष त्यावेळेस मूग गिळून गप्प बसला. आम्ही त्यालासुद्धा सामोरे गेलो आणि निवडणूक जिंकून दाखवली असं त्या म्हणाल्या.


Updated : 2021-11-05T11:13:52+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top