Home > Political > मंत्रिमंडळात फेरबदल करून चुकीच्या धोरणांवर मोदी पांघरूण घालू शकत नाही: मायावती

मंत्रिमंडळात फेरबदल करून चुकीच्या धोरणांवर मोदी पांघरूण घालू शकत नाही: मायावती

मंत्रिमंडळात फेरबदल करून चुकीच्या धोरणांवर मोदी पांघरूण घालू शकत नाही: मायावती
X

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि कॅबिनेट फेरबदल ( Cabinet Reshuffle ) च्या मुद्यावरून बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती ( Mayawati ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्यावर निशाणा साधत मायावती ( Mayawati ) म्हणाल्या की, हा व्यापक बदल करून केंद्र सरकार आपल्या चुकीच्या धोरणांवर परदा टाकू शकत नाही. देशातील जनता परिवर्तनासाठी योग्य वेळेची वाट पाहत असून, भाजपने आता काहीही केलं तरही लोकांची दिशाभूल करू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

मायावती ( Mayawati ) यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील भाजप सरकारदेखील लोकहितात घेत नसलेल्या निर्णय आणि चुकीच्या धोरणांमुळे अपयशी ठरत आहे. कोरोना काळातील त्यांचे धोरण, कार्यशैली आणि हवेतील आश्वासनांबरोबरच पूर्ण न होणाऱ्या घोषणाबाजीमुळे नागरिक दु: खी आहेत, असेही मायावती ( Mayawati ) म्हणाल्यात.


सर्वांचा डीएनए हा एकच असल्याचं दोन दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानावरून सुद्धा मायावती ( Mayawati ) यांनी, भागवत यांच्यावर हल्ला चढवत भागवत यांचे विधान काही गळी उतरत नाही, असा टोला लगावला आहे. तसेच, आरएसएस, भाजपा कंपनीचे लोकं आणि भाजप शासित असलेल्या सरकार यांच्या बोलण्यात आणि कृतीत फरक सगळ्यांना पाहायला मिळत असल्याचं सुद्धा मायावती ( Mayawati ) म्हणाल्या होत्या.

Updated : 8 July 2021 9:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top