Home > 'बीजेपी अपना अहंकारी और तानाशाही रवैया बदले' मायावतींचा योगी सरकारला सल्ला

'बीजेपी अपना अहंकारी और तानाशाही रवैया बदले' मायावतींचा योगी सरकारला सल्ला

बीजेपी अपना अहंकारी और तानाशाही रवैया बदले मायावतींचा योगी सरकारला सल्ला
X

उत्तरप्रदेशमधील हाथरस येथे अतिशय क्रूरपणे युवतीवर अत्याचार करण्यात आला. हे प्रकरण आता स्थानिक पोलीसांकडून दडपण्याचा प्रयत्न देखील होत असल्याचा आरोप आता अनेकांकडून होऊ लागला आहे. या संदर्भात बसपाच्या नेत्या मायावती यांनी सरकारच्या भूमिकेसंदर्भात ट्विट केलं आहे. “हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी व सर्व सत्य माहिती घेण्यासाठी तिथे २८ सप्टेंबर रोजी सगळ्यात आधी बसपाचं शिष्टमंडळ गेलं होतं. मात्र, पोलीस ठाण्यात बोलवूनच त्यांचा संवाद घडवून आणण्यात आला. या संवादानंतर मिळालेला अहवाल अत्यंत दुःखदायक होता. ज्याने मला माध्यमांकडे जाण्यास मजबूर केलं,” असं मायावती यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/Mayawati/status/1312951141777334275

“त्यानंतर तिथे गेलेल्या माध्यमांसोबतही गैरवर्तन करण्यात आलं. काल, परवा विरोधी पक्षांचे नेते व लोकांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार.. हे सगळं अतिशय निषेधार्ह व लज्जास्पद आहे. सरकारला ही अहंकारी व हुकुमशाही वृत्ती बदलण्याचा सल्ला आहे. नाहीतर यामुळे लोकशाहीची मूळच कुमकूवत होतील,” असा सल्ला मायावती यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे.

https://twitter.com/Mayawati/status/1312951143627018240

Updated : 5 Oct 2020 11:40 AM GMT
Next Story
Share it
Top