Home > Political > मंदाकिनी खडसेंना अटकपूर्व जामीन मंजूर ; खडसे कुटुंबाला दिलासा

मंदाकिनी खडसेंना अटकपूर्व जामीन मंजूर ; खडसे कुटुंबाला दिलासा

मंदाकिनी खडसेंना अटकपूर्व जामीन मंजूर ; खडसे कुटुंबाला दिलासा
X

भोसरी MIDC भूखंड प्रकरणी एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना उच्च न्यायालया कडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आल्याने खडसें परिवाराला दिलासा मिळाला आहे.

भोसरी MIDC भूखंड प्रकरणी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसें यांना मुंबई सेशन कोर्टाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले होते , यामुळे मंदाकिनी खडसेंवर अटकेची टांगती तलवार होती.

सेशन कोर्टाने अटकपूर्व जामीन नामंजूर झाल्याने मंदाकिनी खडसेंनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.खडसेंना तूर्तास अटक करू नये असे निर्देश दिले आहेत.17 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर पर्यंत तपासात सहकार्य करण्याचे निर्देशही मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाने दिले आहेत. दिवाळीत खडसेंना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

Updated : 14 Oct 2021 3:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top