Home > Political > "भाजपाशासित राज्यातून आलेले पोलीस मतदार संघात दहशत निर्माण करतायत"

"भाजपाशासित राज्यातून आलेले पोलीस मतदार संघात दहशत निर्माण करतायत"

ममता बॅनर्जी यांचा भाजपवर आरोप

भाजपाशासित राज्यातून आलेले पोलीस मतदार संघात दहशत निर्माण करतायत
X

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमधील नंदीग्रामसह 30 विधानसभा मतदारसंघातील प्रचार मंगळवारी संपला. शेवटच्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत निशाणा साधला. तर भाजपाशासित राज्यातून आलेले पोलीस मतदारांमध्ये दहशत निर्माण करून भाजपाच्या बाजूने निर्णय घेण्यास दबाव आणत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांसाठी आठ टप्प्यात मतदान होत असून, शनिवारी पहिला टप्पा पार पडला. तर आता दुसऱ्या टप्प्यासाठी गुरुवारी (1 एप्रिल रोजी) 30 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. तर ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राम मतदारसंघासाठी सुद्धा दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.

त्यापूर्वी आपल्या शेवटच्या प्रचारसभेतून ममतांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजपाशासित राज्यांतील पोलिस दलांना नंदीग्राम येथे ग्रामीण भागातील मतदारांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आणि भाजपाच्या बाजूने निर्णय घेण्यास आणले गेले असल्याचा गंभीर आरोप ममतांनी केला आहे. तसेच भाजपच्या लोकांवर हल्ले करून त्याच खापर टीएमसीवर फोडण्याची तयारी सुरू असल्याचं सुद्धा ममता म्हणाल्यात.

Updated : 31 March 2021 5:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top